7 thoughts on “Almatti Dam | धरणातून 5लाख 30हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू/almatti is the reason of flood??

 1. Hi  My friend 💏💏
  very nice video 🍀🍀
  Big like ❤️4❤️ see you again 🖐️🖐️
  From KOREA🇰🇷🇰🇷

 2. आलमट्टी धरण आणि सांगली कोल्हापूर महापूर याचा संबंध खरंच आहे का??

  आलमट्टी धरण हे विजापुर जिल्ह्यात येत जे कृष्णा नदीवर बांधलं गेलंय. याची एकुण उंची समुद्र सपाटी पासुन 519.60 मीटर (MSL) इतकी आहे.
  आलमट्टी आणि सांगली कोल्हापूर यांच्या मधात अजुन एक छोट धरण येतं ते म्हणजे हिप्परगी ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 531.40 मीटर (MSL) इतकी आहे.
  याप्रमाणे सांगली 549 मीटर (MSL) तसेच कोल्हापूर 546 मीटर (MSL) इतकी आहे.
  अहो आम्हाला जे विज्ञान शिकवलं गेलंय किंवा जे वैज्ञानिकरित्या योग्य आहे ते म्हणजे वाहणार पाणी हे चढ भागाकडून उतार भागाकडे जातं. त्याप्रमाणे हे पुराचं पाणी आलमट्टी धरणापर्यंत पोहचत..!
  त्या आलमट्टी धरणानी पूर्ण क्षमतेने जरी पाणी अडवलं तरी सांगली आणि कोल्हापूर हे जवळ जवळ 27 ते 30 मीटर (MSL) उंचीवर म्हणजे जवळपास 90 ते 100 फूट उंचीवर राहतं.
  आता मला सांगा आलमट्टी धरणाचे पाणी हे आपोआप 100 फूट उंचीवर कसं पोहचेल..???
  "आलमट्टीमुळे सांगली, कोल्हापूर भागात महापूर…!"
  काही बिनडोक राजकारणी अन मराठी प्रसारमाध्यमे लोकांना अश्याप्रकारच्या बातम्या सांगुन दिशाभुल करीत आहेत.
  तेव्हा त्यांना एक नम्र विनंती ही की आधी पुर्ण अभ्यास करा आणि मग प्रसारमाध्यमावर बोला उगा बिनबुडाचे आरोप नका करू..!
  कर्नाटकच्या जनतेचं काही वैर नाही आहे महाराष्ट्र सोबत..!
  आणि तुम्हाला पाण्यात ठेवायला आम्हाला स्वतःला ही पाण्यात राहावं लागेल ना भाऊ..!
  उन्हाळयात जे घडलं ते दोन्ही राज्यातील घाणेरडं राजकारण होतं हो..!
  आता सध्या जितके पाणी धरणात येतंय तितकं किंवा त्याहून अधिक पाणी आलमट्टी धरणातून बाहेर सोडलं जातं आहे. हा महापूर आलमट्टी धरणाचा प्रसाद नसून तुमच्या भागातील नेत्यांनी केलेल्या बिनडोक विकासाचा परिणाम आहे तेव्हा जागे व्हा आणि पुर ओसरल्यावर त्यांना जाब नक्कीच विचारा…!
  सध्या स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या..!
  😊😊😊😊😊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *